Monday, December 30, 2024

/

जेडीएस स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन करेल

 belgaum

बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकीय वातावरण हळूहळू तापत चालले असून राज्यात आपलीच सत्ता स्थापन होईल, या दृष्टीने राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज्यात जेडीएस स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन करेल, असा विश्वास जेडीएस प्रवक्ते असद्दीन यांनी व्यक्त केला.

एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी जेडीएसच्या निवडणुकीच्या धोरणासंदर्भात खुलासा केला आहे. सध्या संपूर्ण देशभरात मुस्लिम धर्मियांच्या मुद्द्यावरून राजकारण सुरु आहे. राजकारणात कमालीचे बदल होत चालले आहेत. मात्र अशा परिस्थितीत जेडीएस राजकारणापलीकडील उद्दिष्ट्ये ठेवून राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा विश्वास आपल्याला आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्याचा सर्वांगीण विकास, गरिबांना घरे, विद्यार्थ्यांना शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा या धोरणांतर्गत जेडीएस कार्यरत असून जनतेचा प्रतिसाद देखील खूप मोठा असल्याचे ते म्हणाले. ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी कुमारस्वामी जात आहेत त्यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व आणि कल्पनेपलीकडील आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता राज्यात जेडीएसची सत्ता नक्कीच येईल, या निवडणुकीत आपण किंगमेकर नाही तर स्वबळावर सत्ता स्थापन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीच्या दरम्यान केवळ जेडीएस पक्ष आणि पक्षाचे नेते निदर्शनात येतात याचे कारण काय? सी. एम. इब्राहिम यांचा पक्षाला कोणता फायदा आहे? त्यांचा स्वतंत्र असा मतदार संघ नसूनही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांचा पक्ष प्रवेश झाला का? अशा प्रश्नावर उत्तर देताना असद्दीन म्हणाले, जेडीएस केवळ निवडणुकीपुरता नाही तर २४ x ७ निरंतरपणे जनतेच्या सेवेत असतो. भाजपकडून पूर्वनियोजन करून गेल्या वर्षभरात मुस्लिम धर्मियांना लक्ष्य करण्यात येत आहे. सी. एम. इब्राहिम हे एक मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यांचा एक वेगळाच अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. भाजपच्या धार्मिक राजकारणाला उत्तर देण्यासाठी कुमारस्वामी योग्य आहेत. शिवाय जेडीएसमध्ये अनेक समर्थ नेते आहेत जे पक्ष संघटनेसाठी कार्यरत आहेत.Jds logo

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ११३ जागांवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक असून जेडीएस शेतकरी, तरुणांना रोजगार, महिला सबलीकरण याविषयी जेडीएस सकारात्मक पद्धतीने काम करत आहे.

आजवर जेडीएसने इतर पक्षाप्रमाणे जनतेला आमिष दाखविले नाही तर दिलेली आश्वासने पळून जनतेची मने जिंकली आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय पक्षाचे सुरु असलेले राजकारण बाजूला सारून धर्मनिरपेक्षता जपणाऱ्या पक्षाला जनता निवडेल, दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षा आपल्या पक्षाला जनतेची अधिक पसंती असल्याचे असद्दीन यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.