Friday, November 15, 2024

/

मतदार याद्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्या आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आल्या असून सदर मतदार याद्यांमध्ये काही दोष असल्यास, किंवा मतदार याद्यांबाबत काही माहिती पुरविण्याची असल्यास मतदार याद्या पुनरीक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे अपर मुख्य कार्यदर्शी तसेच जिल्हा मतदार यादी पर्यवेक्षक एल. के. अतिक यांनी राजकीय पक्षांना केले. मतदार याद्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्यताप्राप्त, नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली होती, या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात येत आहे. प्राथमिक टप्प्यातील मतदार यादी प्रसिध्द झाली असून यासंदर्भात काही दोष असतील तर त्याबाबतचे दावे व हरकती ८ डिसेंबर रोजी स्वीकारल्या जाणार आहेत. अंतिम मतदार यादी १ जानेवारी २०२३ रोजी जाहीर होणार असल्याची माहिती अतिक यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदारांची नावे समाविष्ट करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या. याव्यतिरिक्त महाविद्यालयातील पात्र मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पावले उचलण्यात यावीत, यासाठी विद्यपेठांना पत्र लिहिण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी तसेच मतदार यादी पर्यवेक्षकांना देण्यात आले.

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ४४३४ मतदान केंद्रे आहेत. यापैकी शहरी भागात ३२५५ तर ग्रामीण भागात ११७९ मतदान केंद्रे आहेत. प्राथमिक स्वरूपातील मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणासाठीचे दावे व हरकती स्वीकारण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. या यादीत १९,१६,७९७ पुरुष आणि १८,७१,३४८ महिला आणि १२१ इतर असे एकूण ३७,८८,२६६ मतदार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बूथनिहाय एजंटची नियुक्ती करून मतदार यादी सुधारण्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांनीही हातभार लावावा, १८ ते १९ या वयोगटातील मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्याचे काम करावे लागणार आहे. याला गती देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या.Dc meeting

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर सर्व बूथ लेव्हल ऑफिसर्सनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे आणि मतदार यादी सुधारण्याच्या उद्देशाने योग्य पद्धतीने काम करावे. मतदार यादीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत, दिव्यांग मतदारांची नावे जोडण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना मतदार यादी पर्यवेक्षक एल.के. अतिक यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.