बेळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हिंडलगा कारागृहात १९५० साली शिक्षा भोगली. या कारागृहातील सावरकरांच्या कोठडीला अनेकजण भेट देण्यासाठी येतात तसेच सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन करतात.
अधिवेशनानिमित्त बेळगाव दौऱ्यावर असणारे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनीदेखील आज या कारागृहातील सावरकरांच्या कोठडीला भेट दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, हिंडलगा कारागृहातील स्वा. सावरकरांच्या कोठडीला भेट देऊन आपण या कोठडीची पाहणी केली. याचप्रमाणे येथील सुविधांचीही पाहणी केली.
सध्या ८०० हुन अधिक कैदी या कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचीही आपण माहिती घेतली.
गृहमंत्री पुढे म्हणाले, उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी सरकार कोणताही दुजाभाव ठेवत नाही. बुधवारीदेखील उत्तर कर्नाटकाच्या विकासाबाबतच चर्चा झाली असून या भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.