Sunday, November 24, 2024

/

फूटपाथवरील ‘या’ पथदिपांना कोणी वाली आहे का?

 belgaum

सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहराची रंगरंगोटी व स्वच्छता करण्यात आली असली तरी बी. एस. येडीयुरप्पा मार्गाच्या फुटपाथ वरील बंदावस्थेतील कांही पथदीप वेलींनी गुरफटलेल्या अवस्थेत धुळ व गंज खात पडून असल्याने पादचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बेळगाव सुवर्ण विधानसौध येथील कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख प्रशासकीय इमारतींचे नूतनीकरण, प्रमुख रस्त्यांची साफसफाई, खराब रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजकांची रंगरंगोटी वगैरे अनेक विकास कामे राबविण्यात आली.

त्यानुसार वर्षभर दुर्लक्षित राहणाऱ्या बी. एस. येडीयुरप्पा या रस्त्याची देखील झाडलोट करून साफसफाई करण्यात आली. मात्र हे करत असताना या रस्त्याच्या फूटपाथवर बसविण्यात आलेल्या पथदिपांच्या खांबांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, हेस्कॉम यापैकी कोणीच वाली नसल्यामुळे लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या या पथदिपांपैकी बंदावस्थेतील कांही दिव्याचे खांब सध्या धूळ व गंज खात पडून आहेत.Foothpath  light repair

रानटी वेलीनी झाकल्या गेलेल्या या पथदिपांच्या खांबांमुळे रस्त्याच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. याबद्दल या फूटपाथ वरून ये -जा करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

तसेच लोकप्रतिनिधींसह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन फूटपाथ वरील दुर्लक्षित पथदिपांची साफसफाई करून ते पूर्ववत प्रज्वलित करावेत, अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.