शिमोगा जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. विक्रम आमटे यांचे सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा बेळगावात आगमन झाले आहे.
बेळगावातील मागील हिवाळी अधिवेशना दरम्यान पोलीस प्रशासनाच्यावतीने तत्कालीन पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. विक्रम आमटे यांच्यावर अधिवेशनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यांनी ती समर्थपणे यशस्वीरित्या पार पाडली होती.
त्यामुळे यावेळी देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. आमटे यांच्यावर मोठा विश्वास दाखवून आगामी हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
अधिवेशन बंदोबस्ताची जबाबदारी यापूर्वीच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्यावर सोपविले जाणार असा काहींचा अंदाज होता. मात्र ती जबाबदारी आता शिमोगा अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. विक्रम आमटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.