बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न नियुक्त केलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावात होणाऱ्या आगामी कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात सहभागी होणार आहेत.
खासदार धैर्यशील माने यांनी आपला बेळगाव दौरा जाहीर केला असून बेळगाव पोलिसांना याबाबतचे पत्र दिले आहे. यंदाच्या महा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दौरा जाहीर केलेले माने हे महाराष्ट्राचे पहिले लोकप्रतिनिधी आहेत.सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनीही बेळगावला येण्याचे जाहीर केले आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सर्वपक्षीयांना पत्र देऊन मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये खासदार माने यांनी सीमा भागात आपल्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा व्यवस्था पुरवावी असे नमूद केले आहे.
सोमवार 19 डिसेंबर रोजी बेळगाव येथील वक्सिन डेपो मैदानावर कर्नाटक अधिवेशन विरोधी महामेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे या मेळाव्यात धैर्यशील माने सहभागी होणार आहेत.
शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झालेले खासदार धैर्यशील माने यांची तोफ बेळगाव येथील वॅक्सिंग डेपो मैदानावर धडाडणार आहे.
धैर्यशील माने यांचा बेळगाव दौऱ्याचा तपशील खालील प्रमाणे आहे. सकाळी 9:30 वाजता कोल्हापुर येथील रुईकर कॉलनी येथील आपल्या निवासस्थानाहून ते बेळगावच्या दिशेने रवाना होणार आहेत तर सकाळी 11:30 वाजता व्हॅक्सिन डेपो येथील महाराष्ट्र केकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी होऊन दुपारी 1:30 वाजता पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने कूच करणार आहेत.
खासदार धैर्यशील माने यांचा आगामी म ए समितीच्या महा मेळाव्यात सहभागी होण्याचा बेळगाव दौऱ्याचा तपशील खालील प्रमाणे pic.twitter.com/bNVXNTE8n8
— Belgaumlive (@belgaumlive) December 17, 2022