Wednesday, November 20, 2024

/

कोरोनाचा महामारिचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेला आढावा

 belgaum

कोरोनाची घातकता ही सुरुवातीला होती जेंव्हा तो आपल्या शरिराशी अनोळखी असून अनैसर्गिक होता, पण आता नाही. आज आपल्याला भेडसवणारी समस्या म्हणजे ज्या‌वेगान नैसर्गिकरित्या उत्परिवर्तन घडून हा विषाणू नवरुप धारण करीत आहे. तेच आपल्याला भेडसावणारे आहे. त्यामुळे काळजीपूर्वक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत करून, बिनधास्त रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन पदव्युत्तर विज्ञान शाखा, रसायनशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे विद्यार्थी महांतेश कोळुचे यांनी केले आहे.

‘कोरोना’ हा एक नैसर्गिक विषाणु नसून तो मानवनिर्मित आहे आणि हे एका ‘अमानवतावादी विस्तारवाद भावना’ बाळगणाऱ्या सर्वसंपन्न, सर्वक्षम राष्ट्राकडून झालेल आहे. ज्याची शास्त्रोक्त पद्धतीने पुष्टी होवू शकते. आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास कोणताही नैसर्गिक विषाणू किंवा इतर सुक्ष्मजीव इतक्या लवकर बदलत्या भौगोलीक परिस्थितीशी जुळवून घेवूच शकत नाही. जर तसं असेलच तर आपलं शरीरही त्याला तितक्याच लवकर‌ जुळवून घेवून प्रतिकार देऊ शकते आणि देत आहे. त्यामुळे हा रोग आपल्याला प्राणघातक नसून तो होवू शकतो. तेही जर शारिरीक रोगप्रतिकार शक्ती आपली कमी किंवा इतर कोणत्याही रोगाने ढासळलेली असेल तरच.

‘विषाणू’ हे एक असे अपेशीय सूक्ष्मजीव आहेत जे बाहेर निष्क्रीय असतात पण जर निष्क्रिय अवस्थेत त्याच्या अमुक स्वयंकालाच्या ( शेल्फ -लाइफ) आत जर त्याला आश्रयदाता शरीर मिळालं तर आश्रयदात्या शरिरातील पेशींच्या पोषणावर उपजिवीका करुन त्या पेशिंच्या डीएनएशी एकरुप होवून, त्या पेशीत शरिराला अनैश्चिक, विक्रृत असा बदल घडवून हे विषाणू सलग पेशींचा नाश करतात आणि आपली संख्या वाढवतात. सदर विषाणू प्रत्येक पेशीत शिरून त्या पेशीचे नियमित जीवनचक्र बिघडवून बदलतात. ज्यामुळे शरिरात सर्वत्र त्याचे विष पसरते( व्हायरल पार्टिकल्स) व शारिरीक रोगप्रतिकार शक्ति हतबल होते. याच विषामुळे सर्वत्र शरिरात ठिकठिकाणी जखम निर्माण होवून नियमीत चालणारे अवयव निकामी होतात. तसेच रक्तवाहिन्यांतील रक्त गोठले जावून वाहिन्या रक्तप्रतिबंधीत (ब्लॉक) होतात. ज्याने रक्तपुरवठा थांबतो व‌ आपण अनेकविध झटक्यांनी (अटॅक) मृत्युमुखी पडतो.

अशा‌ या विषाणुशी लवकरात लवकर जुळवून घेवून जर आपल्या शरिराने प्रतिकार दिला तर आपण टिकाव धरू शकतो. नाहीतर बाह्योपचार जे कांहीवेळा गुणकारी ठरतात तर काहीवेळा ठरत नाहीत. अशांवर कांही काळ निर्वहन होते व शेवटी देहांत होतो. कोरोना या सुक्ष्मजीवाची अशी घातकता ही सुरुवातीला होती, जेंव्हा तो आपल्या शरिराशी अनोळखी असून अनैसर्गिक होता, पण आता नाही. हा विषाणु आपल्या शरिरास एक सर्वसामान्य विषाणु प्रमाणे आहे. ज्या विषाणुंचा सामना आपले शरीर दररोज करते. तरिही आज आपल्याला भेडसवणारी समस्या म्हणजे ज्या‌वेगान नैसर्गिकरित्या उत्परिवर्तन घडून हा विषाणू नवरुप धारण करीत आहे. तेच आपल्याला भेडसावणारे आहे. ज्या प्रत्येक रुपावतरणाच नामकरण पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट असे होत आहे. त्यामुळे काळजीपूर्वक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत करून बिनधास्त रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन महांतेश कोळुचे यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.