बेळगाव : नगर विकास प्राधिकरणाने केलेल्या बेकायदेशीर जमीन वाटपाविरोधात लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपण्णावर यांनी दिली. शुक्रवारी बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मागील वर्षी मार्च महिन्यात बुडातर्फे ऑनलाईन सूचना देण्यात आली होती. मात्र १८ मार्च रोजी मॅन्युअल पद्धतीने जागा वाटप करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. यादरम्यान बुडामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाला असून याबाबत कर्नाटक लोकायुक्तांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आल्याचे टोपाण्णावर यांनी सांगितले.
कर्नाटक सरकारच्या सर्व विभागांमध्ये कोणीही मॅन्युअल कामकाज करत नाही. प्रत्येकजण ऑनलाइन पद्धतीवरच भर देत असून मॅन्युअल पद्धतीमध्ये फसवणूक होण्याची अधिक शक्यता असूनही बुडाने मॅन्युअल पद्धतीने कामकाज करून बेकायदेशीरपणे भूखंड विक्री केले आहेत, असे आरोप त्यांनी केले.
महागड्या जागा कमी दरात विकून घोटाळा करण्यात आल्याची शंका उपस्थित होत असून सरकारने या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
बुडाच्या भ्रष्ट अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून येत्या काही दिवसांत न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.