बेळगाव सीमाप्रश्ना बाबतचा सध्याचा वाद म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मॅच फिक्सिंग आहे, असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार उर्फ राजीव टोपण्णावर यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाचे नेते राजीव टोपण्णावर यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून हा आरोप केला आहे. ‘बेळगाव सीमा प्रश्नाचा सध्याचा वाद म्हणजे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मॅच फिक्सिंग आहे.
बोम्मई तुम्ही बेळगावचे विकास प्रकल्प हुबळीला हलवले जात आहेत त्यावर कांही बोलत नाही. बेळगावहून दिल्ली आणि मुंबईला असलेली विमान सेवा रद्द झाली त्याकडे लक्ष देण्यास तुम्हाला वेळ नाही.
परंतु सीमावादावर ट्विट करायला तुमच्याकडे वेळ आहे. आता कर्नाटकातील सरकार हे डबल इंजिन नव्हे ट्रिपल इंजिन सरकार बनले आहे’, अशा आशयाचा मजकूर टोपण्णावर यांच्या ट्विटमध्ये नमूद आहे.
Belagavi Border dispute issue presently a fixed match between @BSBommai & @Dev_Fadnavis @BSBommai you are not vocal on projects for belagavi taken to Hubli. flights from belagavi to Delhi, Mumbai canceled but u have time to to tweet on border issue. triple engine govt?
— Rajkumar Topannavar (@RajeevTopanavar) December 9, 2022