Monday, January 20, 2025

/

वीरेश हिरेमठ धर्मसेवक सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

 belgaum

बेळगाव शहरातील विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे जनसंपर्क अधिकारी व सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘धर्मसेवक सेवारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

हावेरी गावातील शिग्गाव तालुक्यातील बिसनल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या काशी जगद्गुरूंच्या सामूहिक इष्टलिंग महापूजेच्या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांना धर्मसेवक सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी काशी जंगमवाडी मठाचे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, नूतन अधिष्ठाता डॉ. मल्लिकार्जुन विश्वाचार्य शिवाचार्य महास्वामी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आदी मान्यवर उपस्थित होते.Veeresh h

सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ हे गेल्या कांही वर्षांपासून आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून बेळगाव शहर परिसरात जनसेवा करत आहेत. देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन करणे. त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने अग्नि दहन करणे,

शाळांमध्ये मार्गदर्शन करणे, विविध औषधी रोपट्यांचे मोफत वाटप करणे, दुर्बल घटकांना मदत करणे यासह कोरोना काळात त्यांनी मोलाची सेवा बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना धर्मसेवक सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.