किल्ला तलावात न्यू गांधी नगर बेळगाव येथे राहणाऱ्या ऑटो चालक युवकाचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला आहे.
अस्लम छज्जु वय ३५ रा.चौथी गल्ली न्यू गांधी नगर बेळगाव असे मयत ऑटो चालकाचे नाव आहे. अस्लम याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? किल्ला तलावात उडी घेऊन आत्महत्या केली की कोणता घातपात आहे पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार अस्लम हा ऑटो चालक होता त्याने किल्ल्या समोर रिक्षा थांबवली होती रविवारी सकाळी किल्ला तलावात त्याचा मृतदेह तरंगत असलेल्या स्थितीत मिळाला आहे.घटनास्थळी मार्केट पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे.
अस्लम यांचे त्यांच्या शेजाऱ्याशी वाद होते दोन दिवसापूर्वी जोरदार भांडण झाले होते त्यावेळी शेजाऱ्या कडून धमकी मिळाली होती त्यामुळे अस्लम यांचा घातपात झाला असावा असा संशय त्याच्या नातेवाकांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे त्यांनी रिक्षा किल्ल्याकडे पार्क करून स्वतः आत्महत्या केली असावी अशीही शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झालाय हे पोलीस तपासा नंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान पोलिसांनी किल्ला तलाव परिसरातील सी सी टी ची फुटेज तपासल्या नंतर या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता असून मार्केट पोलीस अधिक तपास करत आहेत.