बेळगांव शहरातील भाऊराव काकतकर कॉलेजचा राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम.कॉम. चौथ्या सेमिस्टर अंतिम वार्षिक परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थिनी अश्विनी अशोक कुराळे ही प्रथम श्रेणीसह गुणवत्तेत उत्तीर्ण होत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक आली आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम.कॉम. चौथ्या सेमिस्टरच्या अंतिम वार्षिक परीक्षेत भाऊराव काकतकर (बी.के.) कॉलेजच्या अश्विनी कुराळे या विद्यार्थिनीने 2400 पैकी 1828 (76.17 टक्के) गुण संपादन करत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अश्विनी मागोमाग रेणुका संभाजी कडोलकर (76.46 टक्के) आणि ज्योती बसवराज धारेपणावर (73.46 टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे.
गेल्या ऑक्टोबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या एम.कॉम. चौथ्या सेमिस्टरच्या अंतिम परीक्षेस भाऊराव काकतकर कॉलेजचे एकूण 14 विद्यार्थी विद्यार्थिनी बसले होते. हे सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण असून विशेष म्हणजे 14 पैकी दहा विद्यार्थी विद्यार्थिनी प्रथम श्रेणीसह गुणवत्तेत उत्तीर्ण झाले आहेत. एकंदर या परीक्षेत भाऊराव काकतकर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे.
उपरोक्त पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनी वगळता परीक्षेत यशस्वी उत्तीर्ण झालेल्या अन्य विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये मालाश्री निंगाप्पा जाधव (73.42 टक्के), मयुरी मोहन नाईक (72.79 टक्के), पूजाश्री परांडे (72.50 टक्के), रोहिणी हनुमंत गुरव (71.92), संतोष गोवेकर (71.83 टक्के),
लक्ष्मी विजय नाईक (71.21 टक्के), किरण दीपक ताटे (70.29 टक्के), मेघा बी. बामणे (69.67 टक्के), पल्लवी विलास काकतकर (67.79 टक्के), रश्मी डांबले (66.75 टक्के) आणि श्रुती बसवानी घसारी (66.33 टक्के) यांचा समावेश आहे. अश्विनी कुराळे हिच्यासह एम.कॉम. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.