बेळगाव : बेळगाव विमानतळ सभागृहात आज विमानतळ सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वाधिक रहदारीसाठी नवीन टर्मिनल बांधणे,
मोठ्या विमानांचे लँडिंग सुलभ करण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करणे, इंडिगो एअरलाइन्सकडून जयपूर आणि बंगळुरूसाठी नवीन उड्डाणे सुरू करणे तसेच इतर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना पार्किंग शुल्क, विमानतळ प्रवेशद्वाराजवळील स्वच्छता, भूसंपादन प्रक्रिया आदी समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच या सूचना लक्षात घेऊन पुढील बैठकीत चर्चा करून तोडगा काढण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी इराण्णा देयन्नावार, संजय भंडारी, अनुप काटे, गुरुदेव पाटील, श्रीमती शेट्टी, आजरेकर, विमानतळ संचालक मौर्य, सहायक आयुक्त चव्हाण, बसापूर सीपीआय आदी उपस्थित होते.