मारहाणी नंतर युवकाचा मृत्यू

0
8
Vinay nicchal
 belgaum

भारतनगर, शहापूर येथे दोन गटात झालेल्या वादात हाणामारीतून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनायक शिवाजी निच्चळ (वय ३८) असे मृत युवकाचे नाव आहे. लघुशंकेवरून सुरु झालेल्या वादावादीतून युवकाला झालेल्या मारहाणीतून सदर युवकाचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास लघुशंकेवरून वाद सुरु झाले. मृत विनायक आणि त्याचा मित्र हे दोघेही लघुशंकेसाठी गेलेले दिसल्याने सदर जागा हि लघुशंकेची आहे का? असा जाब दुसऱ्या गटातील युवकांनी विचारला.

यावरून सुरु झालेल्या किरकोळ वादावादीचा प्रकार हाणामारीत बदलला. त्यानंतर येथील स्थानिकांनी दोन्ही गटातील वाद मिटवले. शुक्रवारी रात्रीच हा वाद मिटला होता.Vinay nicchal

 belgaum

मात्र शनिवारी सकाळी विनायकाच्या छातीत दुखू लागले. यावेळी झालेला प्रकार त्याने कुटुंबियांना सांगितला. त्याला तातडीने के एल इ रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.Shahapur police station

यानंतर विनायकाच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या गटातील तरुणांवर तक्रार दाखल केली असून सर्व तरुणांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिस निरीक्षक सुनील कुमार एच अधिक तपास करत आहेत.

मयत विनायक याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.