रिंग रोड विरोधात २८ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या चाबूक मोर्चाला विविध संघटनांचा पाठिंबा वाढत चालला असून आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने एपीएमसी मार्केट बरोबच भाजी मार्केट संघटनेचाही पाठिंबा मिळविला आहे.
भाजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांची भेट घेत समिती शिष्टमंडळाने जमीन संपादनाविरोधात पुकारण्यात आलेल्या चाबूक मोर्चाला पाठिंबा देण्याची विनंती केली. समितीच्या विनंतीला मान देऊन एपीएमसी आणि भाजी मार्केट संघटनेने समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य गावोगावी रुजत चालले असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या रिंग रोड संदर्भात पुकारण्यात आलेल्या चाबूक मोर्चासंदर्भात जनजागृतीसाठी गावोगावी बैठकाहि घेण्यात येत आहेत.
या बैठकांच्या माध्यमातून मोर्चा आणि रिंगरोड संदर्भात मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात येत असून प्रत्येक गावात नागरिकांचा मोठा पाठिंबा दर्शविला जात आहे.
एपीएमसी मार्केट आणि भाजी मार्केट संघटनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा नेते आर. एम. चौगुले, दीपक पावशे, एम. जी. पाटील, ऍड. सडेकर आदींचा समावेश होता.