Thursday, December 19, 2024

/

हा’ धोका अपघातानंतरच टळणार का?

 belgaum

‘बेळगाव : एपीएमसी रोड, कंग्राळी खुर्द आणि पोलीस क्वाटर्सच्या समोर असलेल्या सायकल ट्रॅक नजीकच्या गटारीवरील झाकण गायब करण्यात आले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून ही गटार अशीच उघडी असून यावर नारळाच्या झाडाच्या फांद्या झाकण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची मोठी वर्दळ असल्याकारणाने याठिकाणी सायकल ट्रॅक बनविण्यात आला आहे.

मात्र याच सायकल ट्रॅकवरील गटारीच्या झाकणाचा पत्ता लागत नसल्याने सध्या ही गटार धोकादायक बनली आहे. या परिसरात प्रकाशाचीही सोय नसल्याने रात्रीच्या वेळी कधीही अनावधानाने यात तोल जाऊन पडण्याची शक्यता आहे. याच परिसरात पोलीस क्वाटर्स असूनही आजपर्यंत उघड्या घटारीकडे कोणाचेच लक्ष गेले नाही ही विचित्र वाटण्यासारखी बाब आहे.Apmc

या गटारीवरील झाकण चोरांनी पळविले असून गेल्या कित्येक दिवसांपासून उघड्या असलेल्या गटारीवर झाकण बसविण्याचे सौजन्य संबंधित प्रशासनाने दाखविले नाही. त्यामुळे एखादा अपघात घडल्यानंतरच याकडे लक्ष पुरविणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.