पूर्वपरवानगीशिवाय दीर्घ कालावधीसाठी गैरहजर राहिल्याबद्दल दोन प्रथम श्रेणी सहाय्यकांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बडतर्फ केले आहे. दीर्घ कालावधीसाठी गैरहजर राहून कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी बडतर्फीची आदेश जारी करण्यात आला आहे.
रामदुर्ग तालुक्यातील तहसील कार्यालयाचे प्रथम वर्ग सहाय्यक सी. एन. नागूर आणि रायबाग तालुक्यातील तहसील कार्यालयाचे प्रथम श्रेणी सहायक ए. बी. बसर्गी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहणे आणि जबाबदारी योग्य पद्धतीने न पार पाडता कर्त्यव्यात कसूर करणे या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
रामदुर्ग येथील सी. एन. नागूर यांना गैरहजेरीबाबत लेखी नोटीस बजावूनही योग्य कारण न दिल्याने तसेच संबंधित कागदपत्रे सादर न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. तर रायबाग येथील ए. बी. बसर्गी यांनी लेखी निवेदन सादर करूनही अवाजवी कारण दिल्याचे आढळून आल्यामुळे.
आणि या कारणांची सत्यासत्यता पडताळून पाहिल्यावर यात त्रुटी दिसून आल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना कर्नाटक नागरी सेवा नियम १९५७ च्या नियम क्रमांक ८ नुसार बडतर्फ करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.