Friday, December 20, 2024

/

सपना बुक मॉलतर्फे भव्य कथा लेखन महोत्सव

 belgaum

सपना बुक मॉलतर्फे ‘स्टोरी बुक -2022’ या 1 लाख 70 हजार रुपये बक्षीस रकमेच्या भारतातील भव्य कथा लेखन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धात्मक कथा लेखन महोत्सव 12 ते 18 वर्षे वयोगट आणि 18 वर्षावरील वयोगट अशा दोन गटांमध्ये घेतला जाणार आहे. सदर महोत्सवातील सहभागासाठी प्रवेश विनामूल्य असून नांव नोंदणी ऑनलाइन करता येईल.

या स्पर्धात्मक कथालेखन महोत्सवातील यशस्वी कथा लेखकांसाठी 1 लाख 70 हजार रुपये किमतीची रोख रकमेसह आकर्षक पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. लेखकांनी कोणत्याही विषयावर फक्त इंग्रजी व कन्नड भाषेतील कथा पाठवायच्या आहेत. याखेरीज कथेसाठी शब्द मर्यादा 1200 इतकी असणार आहे. महोत्सवातील सर्वोत्तम कथा सपना बुक हाऊसतर्फे प्रकाशित केल्या जाणार आहेत.

महोत्सवात नांव नोंदविण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 ही असून नांव नोंदणी व आपल्या कथा पाठवण्यासाठी स्पर्धकांनी www.storybrook.in या ठिकाणी भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी 0831 -4255499 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.