नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी सहा वर्षे वयोमर्यादा अनिवार्य करण्याचा आदेश साक्षरता विभागाच्या अप्पर सचिवांनी जारी केला आहे. २०२५-२६ पासून हा शैक्षणिक आदेश लागू होणार आहे.
मुलाचे वय १ जूनपर्यंत ६ वर्षे पूर्ण असावे, यासंदर्भात सर्व डीडीपीआय, बीईओ आणि आयुक्तांना कळविण्यात आले आहे.
इयत्ता पाहितीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचे वय ५ वर्षे ५ महिने आणि ५ वर्षे १० महिने असावे, असा पूर्वी नियम होता. मात्र आता सरकारने आरटीई शिक्षण कायदा, सक्तीचे शिक्षण नियम २०१२ नुसार नवी वयोमर्यादा निश्चित करणारा आदेश जारी केला आहे.
राज्याच्या वित्त विभागाने इयत्ता ६वी ते इयत्ता ८वीच्या वर्गासाठी पदवीधर शिक्षकांच्या भरतीसाठी विद्यमान प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बढती देण्याचे मान्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील ४- टक्के प्राथमिक शिक्षकांना बढती दिली जाणार असून सदर शिक्षक आता इयत्ता ६वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत.