विजापूरच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अर्थात अतिरिक्त अधीक्षकपदी शंकर मारिहाळ यांची नियुक्ती झाली आहे. काल शनिवारी यासंबंधी आदेश जारी करण्यात आला असून लवकरच ते अधिकार पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
शंकर मारीहाळ हे मूळचे बेळगाव तालुक्यातील मोदगा गावचे सुपुत्र आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगाव येथील मार्केट पोलीस ठाण्यासह निपाणी तसेच अन्य विविध पोलीस स्थानकात सेवा बजावली आहे. कारवार मध्येही काही काळ त्यांनी सेवा बजावली होती.
यापूर्वी हुबळी येथील हेस्कॉमच्या पोलीस प्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाली होती. आता विजापूरचे नूतन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पदी त्यांची वर्णी लागली आहे. एक मितभाषी निगर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.