या’ कारणासाठी सतीश जारकीहोळींनी आपले वक्तव्य घेतले मागे

0
7
Satish jarkiholi
 belgaum

 

‘हिंदू’ हा शब्दां बाबत वक्तव्य केल्यानंतर आमदार सतीश जारकीहोळी यांच्यावर राज्यभरासह देशातून टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात बोलताना मला सर्वापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून मी माझे वक्तव्य मागे घेतले आहे, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

शहरातील काँग्रेस भवन येथे आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार सतीश जारकीहोळी यांनी काल थेट मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र पाठवून आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे नमूद केले होते तसेच आपल्या वक्तव्याबद्दल चौकशी समिती तातडीने स्थापन करण्याची मागणीही केली आहे. मी केलेले वक्तव्य मागे घेण्यासाठी माझ्यावर वेगवेगळ्या कारणाने अनेकांचा दबाव होता.

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी चर्चा करून मी माझे वक्तव्य मागे घेतले आहे असे जारकीहोळी यांनी सांगितले. वैयक्तिक वक्तव्य करताना अनावधानाने माझ्याकडून पक्षाचे नुकसान झालं ते नुकसान अधिक होऊ नये म्हणून मी हे पाऊल उचललं आहे.

‘हिंदू’ या शब्दाबाबत मी ज्या ठिकाणी वक्तव्य केले तो कार्यक्रम पक्षाचा नव्हता तर एक खाजगी कार्यक्रम होता. मात्र मी माझ्या विचारसरणीपासून मागे हटलेलो नाही. त्या संदर्भात येत्या काळात मी सर्वांना माझे मत समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘हिंदू’ या शब्दाबाबत विकिपीडिया, शब्दकोश विविध इतिहासकारांचे लेख, विविध पुस्तकांमधील संदर्भाच्या अनुषंगाने आपण माहिती दिली.

पण आपल्याला बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र रचले आहे, असेही आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले. पत्रकार परिषदेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, गणेश हुक्केरी, माजी आमदार रमेश कुडची आदी काँग्रेस नेतेमंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.