Wednesday, May 1, 2024

/

पोलिस कस्टडीतल्या मृत्यूमागील कारणामागे मोठी गुंतागुंत!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष -गांजा विक्री प्रकरणातील संशयिताला चौकशीसाठी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले असता, शुक्रवारी रात्री पोलीस कोठडीतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सदर संशयिताच्या मुलीने हा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला नसून पोलीस कोठडीत झाल्याचा आरोप केला आहे.

तर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सदर संशयिताचा मृत्यू उपचारादरम्यान झाल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस विभाग आणि संशयितांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनंतर प्रकरणाचा गुंता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. शिवाय हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

<span;>हुक्केरी तालुक्यातील बेल्लदबागेवाडी गावातील बसनगौडा इरणगौडा पाटील (वय ४५) या संशयितास अटक करून चौकशीसाठी एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बसनगौडा इरणगौडा पाटील याला  एनडीपीएसच्या गुन्ह्यात पोलिस ठाण्यात हजर केले होते. यावेळी त्याने तब्येत बिघडल्याची तक्रारदेखील केली होती. दरम्यान त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली.

 belgaum

प्रकृती स्थिरावल्यानंतर पुन्हा त्याला पोलीस स्थानकात आणण्यात आले होते. यावेळी त्याला उलट्या झाल्याने आणि घाम येत असल्याने पुन्हा जिल्हा रुग्णालयात तातडीने रवाना करण्यात आले. मात्र, यादरम्यान उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. सदर प्रकरणाची पोलीस कोठडीतमृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मृताच्या पत्नीकडून फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. पुढील तपासासाठी प्रकरण बंगळुरूला पाठवण्यात येणार असल्याचेहि पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Rural ps
Belgaum rural police station

याप्रकरणी मृत आरोपीच्या कुटुंबीयांनी मात्र पोलिसांवर बोट केले आहे.  कोणतीही माहिती न देता खोटा गुन्हा दाखल करून आपल्या वडिलांना ताब्यात घेतल्याची तक्रार मृत आरोपीच्या मुलीने केली आहे.  आपल्या वडिलांचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाल्याचे आपल्याला सांगितले असून रुग्णालयात  आपले वडील जिवंत असल्याचे सांगण्यात आले होते, दरम्यान काल रात्रीच आपल्याला पोलिसांनी फोन करून वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्याबाबत देखील सांगितले होते,  अशी धक्कादायक प्रतिक्रिया दिली तिने दिली आहे. आपण पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असून ज्यावेळी रुग्णालयात आपण स्टेथेस्कोप घेऊन तपासणी केली त्यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके आपल्याला जाणवले नाहीत.

वडिलांच्या हाताला दोरीने बांधल्याच्या खुणा देखील आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा पोलीस कोठडीतच झाला आहे, असा आरोप तिने केला आहे. ही सर्व माहिती शवविच्छेदनादरम्यान आपण न्यायाधीशांना सांगितली, त्यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले असून माझ्या वडिलांना कायदेशीर न्याय मिळावा यासाठी मी न्यायालयीन लढा देणार असल्याचे मृत बसनगौडाच्या मुलीने सांगितले. पोलीस विभागाने दिलेले स्पष्टीकरण आणि मृतांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेला आरोप यामध्ये गुंतागुंतीचे प्रकरण दिसून येत असून अंतिम चौकशीनंतर यामागील सत्य बाहेर येईल, अशी आशा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.