Saturday, February 1, 2025

/

समिती कार्यालयाच्या बंदोबस्तात वाढ

 belgaum

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. शिवाय सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. इ पार्श्वभूमीवर रामलिंग खिंड गल्ली येथील शहर महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालय आणि शिवसेना कार्यालय तसेच कॉलेज रोड येथील तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयाच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

शुक्रवारी सायंकाळपासून या भागात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची बैठक मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात पार पडल्यानंतर कर्नाटकातील सर्वच नेतेमंडळी हादरली आहेत.

उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या काही घोषणांमुळे कर्नाटक सरकार कडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत. यादरम्यान बसवराज बोम्मई यांनी सांगलीमधील जत यासह अक्कलकोट वर कर्नाटकाचा हक्क असल्याचा दावा करणारे विधान केले आणि यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला.Mes

 belgaum

या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्रात कर्नाटक परिवहनच्या बसेसवर काळ्या शाईमध्ये निषेध नोंदवत जय महाराष्ट्र असा मजकूर लिहिण्यात आला. यानंतर कर्नाटकातदेखील कानडी पुंडांनी महाराष्ट्र बसेसवर याच प्रकारची पुनरावृत्ती केली.

यादरम्यान वातावरण तापल्याने बससेवा स्थगित करण्यात आली. बेळगावमध्ये कन्नड संघटना गोंधळ घालतील याची खबरदारी घेऊन बेळगावमधील समिती कार्यालये आणि शिवसेना कार्यालयावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हे वातावरण शांत होईपर्यंत सदर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील जनतेसाठी महाराष्ट्रातील सरकारी योजनांचा लाभ घेता येईल असे जाहीर केले आहे( उदा: महात्मा फुले जन आरोग्य योजना )त्याबद्दल संपूर्ण माहिती द्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.