अपघातात मेंदू मृत ब्रॅण्डेड झालेल्या हवाई दल कर्मचाऱ्यांच्या अवयवादानामुळे तिघाजणांना नवजीवन मिळाल्याची घटना नुकतीच घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, हवाई दलाचा एक कर्मचारी सकाळी आपल्या पंत बाळेकुंद्री येथील निवासस्थानाहून कामावर जात असताना रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी केएलई डाॅ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये (एमआरसी) दाखल करण्यात आले होते.
गंभीर इजा होऊन ब्रेनडेड झालेला तो 57 वर्षीय कर्मचारी जगण्यासाठी मृत्यूशी लढत होता. मात्र त्याची जगण्याची कोणतीच आशा नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तिघा जणांना नवजीवन प्राप्त झाले आहे.
त्या हवाई दल कर्मचाऱ्यांच्या हृदयाचे केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल एका रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले, तर त्याची दोन्ही मूत्रपिंडे प्रत्यारोपणासाठी एसडीएम हॉस्पिटल धारवाड येथे पाठविण्यात आली आहेत.
मूत्रपिंडं सत्वर सुरक्षित धारवाडला पोहोचावीत त्यासाठी पोलिसांनी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती. ब्रॅनडेड हवाई दल कर्मचाऱ्याच्या नेत्रांचे दोघा अंध व्यक्तींवर प्रत्यारोपण करण्यात आले असून ते दोघेही लवकरच जग पाहू शकणार आहेत.