Thursday, January 23, 2025

/

‘या’ धावपटूचा सत्कार

 belgaum

आसाम गुहाटी येथे झालेल्या 37 व्या राष्ट्रीय कनिष्ठ ॲथलेटिक स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावल्याबद्दल जुने बेळगाव नागरिक व युवा कार्यकर्त्यांतर्फे युवा धावपटू अरुण शंकर माळवी याचा नुकताच सत्कार करण्यात आला.

जुने बेळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक शंकर माळवी यांचा सुपुत्रअरुण शंकर माळवी या होतकरू युवा धावपटूने आसाम गुवाहाटी येथे झालेल्या 37 व्या राष्ट्रिय कनिष्ठ अथेलेठीक स्पर्धेत 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक मिळवून जुने बेळगावाचा गौरव वाढवल्याबद्दल समस्त नागरिक व युवा कार्यकर्तेतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचे भव्य जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सहदेव रेडकर, संतोष शिवणगेकर, बाळू होसुरकर, राजू जाधव, प्रवीण गुरव, निखिल सोमनाचे, शुभम टपाले, विशाल होसुरकर, श्रीधर टपाले, सहदेव रेडकर, सतीश खन्नूकर, आदिनाथ गावडे, जितेंद्र चौगुले, विनोद सालगुडी, अमित देसुरकर,Atheliate feliciation

योगेश खन्नूकर, प्रवीण देसुरकर, सागर जाधव,पाटील, प्रजोत शिंदोळकर व माळवी कुटुंबीयांसह समस्त ग्रामस्थ व युवक मंडळचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते, उदयोन्मुख धावपटू व प्रशिक्षक उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहन खन्नूकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.