Wednesday, December 18, 2024

/

पुढील महिन्यात ‘येथे’ होणार ‘कर्नाटक श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा

 belgaum

माया फ्रेंड्स ग्रुप व जीएसएन ग्लोबल स्पोर्ट्स न्यूट्रिशियन्सतर्फे दावणगिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 11 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता ‘कर्नाटक श्री -2022’ ही राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि वुमन्स स्पोर्ट्स फिजिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सच्या मान्यतेने दावणगिरी येथील मोतीवीरप्पा कॉलेज मैदानावर ही शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मुंबई यांच्या नियमानुसार 55 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो आणि 85 किलो वरील अशा एकूण सात वजनी गटात ही स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेचे प्रवेश शुल्क 200 रुपये आहे. पुरुषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000 रु, 4000 रु., 3000 रु., 2000 रु. व 1000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल बेस्ट पोजर किताब विजेत्यास 5000 रुपयांचे बक्षीस मिळेल. स्पर्धेचे टायटल विजेत्या शरीरसौष्ठवपटूला 30,000 रुपये तर उपविजेत्यास 20,000 रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.

वुमन स्पोर्ट्स फिजिक कॉम्पिटिशन या स्पर्धेतील विजेत्या महिला शरीरसौष्ठवपटूला 15,000 रुपये आणि उपविजेतीस 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. याखेरीज तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 5000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

तरी सदर राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी गंगाधर एम. (9845857230), संतोष एकबोटे (7338503558), माया (9964989878) गंगाप्पा (9448004999) अथवा जगदीश (9731746455) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.