Thursday, December 26, 2024

/

‘या’ चौकाचे किसान चौक असे नामकरण करण्याची मागणी

 belgaum

बेळगाव शहर परिसर व तालुका कृषीप्रधान असल्यामुळे शहराच्या मध्यवर्तीय भागात छ. शिवाजी उद्यानानजीक असलेल्या शहापूर बँक ऑफ इंडिया समोरील चौकाचे ‘किसान चौक’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी नेते राजू मरवे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने केली आहे.

देशातील आणि कर्नाटकातील प्रत्येक राजकारण शेतकऱ्यांशिवाय पुढे जाऊच शकत नाही. निवडणूका आल्या कि प्रत्येक जाहिरनाम्यात शेतकऱ्यांसंदर्भातील मुद्दा ठरलेला असतो.

ही वस्तुस्थिती असताना दुर्दैवाने याच शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येक शहरात एखादा चौक असावा असे एकाही राजकारण्याला वाटत नाही. शेतकरी कुळात जन्मून मोठं झाल्यावरही एखाद्या राजकीय नेत्याने कधी आपल्या कर्तबगारीवर आपल्याच मतदार संघात किंवा इतर ठिकाणी किसान चौक केल्याच कुठे ऐकिवात नाही. तसे असेलतर ते विरळच, असे राजू मरवे म्हणतात.Farmer square

बेळगाव शहर परिसर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी सरकारने अथवा बेळगावच्या स्थानिक लोकप्रतिनिधीनीं एखाद्या चौकाचे ‘किसान चौक’ असे नामकरण करण क्रमप्राप्त होत. असे नामकरण व्हाव म्हणून शेतकऱ्यांनी अथवा शेतकरी संघटनांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यावरून सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आत्मियता आहे ते कळते. तेंव्हा शेतकऱ्यांप्रती आत्मियता दाखवत सरकारने शहरातील छ. शिवाजी उद्यान जवळील शहापूर बँक ऑफ इंडिया समोरील चौकाला किसान चौक असे नामकरण करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

कारण अशा नामकरणामुळे ठराविक एखाद्याचा गौरव होणार नाही तर देशातील प्रत्येक अन्नदात्या शेतकऱ्याचा गौरव होईल असे नमूद करून सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधीनीं याचा गांभीर्याने विचार करावा आणि सदर चौकात मधोमध किंवा बाजूला आकर्षक लक्षवेधी नांगरधारी अथवा बैलजोडीसह शेतकऱ्याचे सुंदर असे शिल्प उभारुन ‘किसान चौक’ असे नामकरण करावे, अशी मागणी रयत गल्ली मा.वडगाव येथील शेतकरी नेते राजू मरवे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.