बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार लवकरच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नवी कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ सदस्यांसह युवकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन तालुका समिती युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले आहे.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर एकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सर्वसमावेशक व्यापक अशी नवी कार्य करणे जाहीर करण्यात येईल असे कळवले होते.
त्यानुसार प्रत्येक गावातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांना नव्या कार्यकारणीत स्थान देण्यात येणार आहे.
त्यामुळे नव्या कार्यकारणीच्या रचनेसाठी तालुक्यातील युवकांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संघटनेची बळकटी आणि सीमा प्रश्न योगदान देऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपले नावे तालुका समितीकडे पाठवून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले होते.
लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील युवकांनी यामध्ये पुढाकार घेऊन नव्या कार्यकारणीत युवक आणि ज्येष्ठांचा भरणा करण्यासाठी नावे पाठवावीत असे आवाहन मंडलिक यांनी केले आहे.