Monday, February 10, 2025

/

अंधांच्या मदतीसाठी डोळस माणुसकी!

 belgaum

‘परिस्थिती’ हा शब्दच एखाद्याची परिस्थिती सांगण्यासाठी पुरेसा आहे. कुणावर, कशी आणि कधी कशापद्धतीची परिस्थिती येईल, हे सांगता येत नाही. चंदगड-बसर्गे येथून दररोज बेळगावमध्ये भजन ऐकवत आपला चरितार्थ चालवणाऱ्या दोघा बापलेकांची कहाणीही काहीशी अशीच आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दररोज चंदगड-बसर्गे येथून यंदेखूट येथील श्री हनुमान मंदिर परिसरात सर्वांना टाळ- मृदूंगाच्या गजरात भजने ऐकविणाऱ्या या बाप-लेकांवर विचित्र अशी परिस्थिती काल ओढवली. भरमू कल्लाप्पा कांबळे आणि त्याचे वडील कल्लाप्पा निंगाप्पा कांबळे हे दोघेही चहा पिण्यासाठी या परिसरातील कॅंटीनमध्ये गेले असता त्यांची ढोलकी, ताट आणि इतर साहित्य चोरांनी लंपास केले.

स्वतः अंध, वडील अंध आणि आई अपंग अशा परिस्थितीत भजन गाऊन आपला उदरनिर्वाह गेल्या कित्येक वर्षांपासून हे कुटुंब करत आहे. विकृत मानसिकतेतून चोरांनी त्यांचे साहित्य लंपास करून त्यांच्या चरितार्थाचे माध्यमच हिरावून घेतल्याने दोघेही कासावीस झाल्याचे पाहायला मिळाले.Angolkar help

यावेळी बेळगावमधील समाजसेवक आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापन सुरेंद्र अनगोळकर यांच्या निदर्शनात हि बाब आली. लागलीच त्यांनी बापलेकांची भेट घेत झालेल्या घटनेची माहिती घेतली.

एखादा माणूस आपला चरितार्थ आपली कला सादर करून चालवत असेल तर याला आपला हातभार लागावा, यासाठी त्यांनी दोघांनाही उद्या नवी ढोलकी भेटीदाखल देणार आहेत . सुरेंद्र अनगोळकर हे नेहमीच अडीअडचणीत सापडलेल्यांच्या मदतीला धावून जातात. कोणत्याही गोष्टीच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता समाजसेवा करतात.

कोविडकाळात त्यांनी केलेली मदत संपूर्ण बेळगावकरांना माहित आहे. त्यांचे समाजकार्य हे सातत्याने सुरु असते. आणि आजदेखील त्यांनी घडविलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा त्यांना कौतुकाची थाप मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.