दरवर्षी आयोजित केली जाणारी आणि यंदाची पाचवी असलेली हाफ मॅरेथॉन बेळगावात मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा तीन टप्प्यात झालेल्या या स्पर्धेत 1200 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यातील अनेक स्पर्धकांचा समावेश होता .
सकाळी ठीक सहा वाजता या मॅरेथॉनचे उद्घाटन ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी, बेळगाव जिल्हाधिकारी निलेश पाटील, सीआरपीएफ चे रवींद्रन, पोलीस आयुक्त बोरलिंगया, ब्रिगेडियर दयालन आणि निराणी साखरचे संगमेश निराणी यांच्या हस्ते क्लब रोडवर संपन्न झाले .
स्पर्धेत सुमारे पस्तीस टक्के महिलांनी भाग घेतला होता. या हाफ मॅरेथॉन मध्ये बेंगलोरचे सर्वात वयस्कर धावपटू श्री जनार्दन (वय वर्षे 90) आणि अनेक वयस्कर स्त्री पुरुष सहभागी झाले होते.
या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे- मोहम्मद साहिल आणिगिरी आणि महिला गटात प्रीणू यादव यांनी प्रथम क्रमांक मिळवून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. त्यांना सोबत टायटन स्मार्ट वॉच भेट देण्यात आले. या स्पर्धेत माहेश्वरी अंधशाळच्या 25 विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.
मराठा रेजिमेंट सेंटरच्या घोड्यांनी मॅरेथॉन चे नेतृत्व करत कार्यक्रमाची भव्यता वाढवली होती.
सर्व फिनिशर्सना मेडल्स, ई सर्टिफिकेट, डिजिटल स्प्लिट टाइम्स, हॉट ब्रेकफास्ट तसेच रूट सपोर्ट प्रदान करण्यात आला.