कर्नाटक राज्य सरकारने येत्या नूतन वर्ष 2023 मध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या व्यतिरिक्त 19 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यादीत समाविष्ट मुस्लिम सण विनिर्दिष्ट तारखांवर येत नसल्यास सणाच्या दिवशी सुट्टी देण्याचे ही निर्देश दिले आहेत.
कर्नाटक सरकारने आगामी 2023 सालातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आगामी वर्षातील सुट्ट्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 26 जानेवारी -प्रजासत्ताक दिन, 18 फेब्रुवारी -महाशिवरात्र, 22 मार्च -उगादी (गुढीपाडवा), 3 एप्रिल -महावीर जयंती, 7 एप्रिल -गुड फ्रायडे, 14 एप्रिल -डॉ. बी. आर. आंबेडकर जयंती, 1 मे कामगार दिन, 29 जून -मोहरम, 15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन, 18 सप्टेंबर -विनायक व्रत 28 सप्टेंबर -ईद मिलाद, 2 ऑक्टोबर -गांधी जयंती, 23 ऑक्टोबर -महानवमी, आयुध पूजा, 24 ऑक्टोबर -विजयादशमी,
1 नोव्हेंबर -कन्नड राज्योत्सव, 14 नोव्हेंबर -दिवाळी, 30 नोव्हेंबर -कणकदास जयंती, 25 डिसेंबर -ख्रिसमस. या पद्धतीने दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त राज्य सरकारने 2023 मध्ये 19 सार्वजनिक सुट्ट्या दिल्या आहेत.
या सुट्ट्यांच्या दिवशी सरकारी कार्यालय बंद राहतील. तसेच या यादीत समाविष्ट मुस्लिम सण विनिर्दिष्ट तारखांवर येत नसल्यास सणाच्या दिवशी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.