गोकाक धबधब्याच्या खाली घटप्रभा नदीच्या काठी कांही गावकऱ्यांना आढळून आलेल्या धोकादायक महाकाय मगरीचा शोध जारीच असून सहा दिवस उलटले तरी या मोहिमेला यश आलेले नाही.
गोकाक धबधब्याखाली घटप्रभा नदीच्या काठावर गेल्या शुक्रवारी स्थानिक गावकऱ्यांना एक प्रचंड मोठी मगर निदर्शनास आली होती. त्यांनी त्याबाबतची माहिती पोलीस आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली.
त्याचप्रमाणे त्यांनी वन्यजीव बचावकर्ता यांना त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत प्रचारण केले. खान यानी मगरीचे छायाचित्र घेण्यासाठी ड्रोन कॅमेराचा देखील वापर केला. सध्या आयुब खान यांच्या नेतृत्वाखाली 9 जणांचे पथक त्या मगरीचा शोध घेऊन तिला पकडण्याच्या कार्यात व्यस्त आहे. सदरशोधकथा मला खात्याचे पाच सदस्य आणि चार तज्ज्ञांचा समावेश आहे.
या संदर्भात माहिती देताना आयुब खान यांनी मगरीला पकडण्यासाठी आपल्याकडे बोटींसह आवश्यक सर्व साहित्य आणि सापळा असल्याचे सांगितले. आढळून आलेली मगर ही सुमारे 10 फूट लांबीची असल्यामुळे तिला पकडण्यासाठी दोन मोठ्या जाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तथापि वारंवार नदीपात्रात दिसून नाहीशी होणारी ती चलाख मगर नदीपात्रात तळाशी असलेल्या दगडांमध्ये लपत आहे. त्यामुळे तिला पकडणे कठीण जात आहे. मात्र तरीही आम्ही त्या मगरीला लवकरात लवकर जेरबंद करू असे खान यांनी स्पष्ट केले.