सहलीसाठी किटवाड येथे गेलेल्या चार तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या किटवाड येथील पर्यटन स्थळी गेलेल्या 40 युवतींपैकी चार तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने सदर तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. बेळगावहून किटवाड येथे पर्यटनासाठी गेलेल्या युवतींसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. एका युवतीला वाचवण्यात यश आले आहे.
आसीया मुजावर वय 17 राहणार उज्वल नगर, कुदरसीया हासिम पटेल वय 20, रुकसाना भीस्ती आणि तस्मिया वय 20, दोघीही राहणार झटपट कॉलनी अनगोळ अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणींची नावे आहेत.
चौघींचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले असून सिव्हिल हॉस्पिटल समोर नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे.बेळगाव शहरातील बाशिबान या मदरसा च्या वतीनं शनिवारी चाळीस मुली पर्यटन म्हणून धरणात गेल्या होत्या त्यावेळी पाण्यात उतरल्या असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
दरम्यान बेळगाव जिल्हा रूग्णालय परिसरात सदर मयत मुलींच्या नातेवाईकानी मोठी गर्दी केली आहे.