बेळगावच्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो खेळाडूंनी कोलार येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय खेळांमधील ज्युडो स्पर्धेच्या 14 व 17 वर्षाखालील मुला -मुलींच्या विभागाचे अजिंक्यपद पटकावत बेळगावच्या नावलौकिकात भर घातली आहे.
कोलार येथे गेल्या 7 ते 9 नोव्हेंबर 2022 या कालावधीत राज्यस्तरीय शालेय खेळांमधील ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवताना बेळगावच्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडोपटुंनी तब्बल 11 सुवर्ण पदकांसह 4 रौप्य पदक आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. सदर यश संपादन करणारे ज्युडोपटू पुढील प्रमाणे आहेत.
14 वर्षाखालील विभाग : मुली -श्वेता अलकनूर (40 किलो) सुवर्ण पदक, दिव्या पाटील (44 किलो) सुवर्ण पदक, संजना शेठ (44 किलो वरील) सुवर्ण पदक. मुले -धीरज हवालदार (30 किलो) सुवर्ण पदक, शिवयोगी (40 किलो) सुवर्ण पदक, संगमेश मदली (45 किलो) सुवर्ण पदक, रियाज किल्लेदार (50 किलो) सुवर्ण पदक.
17 वर्षाखालील विभाग : मुली -अमृता नाईक (40 किलो) सुवर्ण पदक, काव्य जी. (52 किलो) रौप्य पदक, आफरीन बानू (57 किलो) रौप्य पदक. मुले -साई पाटील (50 किलो) सुवर्ण पदक, आर्यन डोंगले (73 किलो) सुवर्ण पदक आर्यन मोरे (100 किलो वरील) सुवर्ण पदक, अमित कुमार (40 किलो) रौप्य पदक, कार्तिक पावसकर (55 किलो) रौप्य पदक, अब्दुल रहमान (60 किलो) कांस्य पदक, सुमुख (66 किलो) कांस्य पदक.
उपरोक्त सर्व ज्युडो खेळाडू जिल्हा क्रिडांगणाच्या ठिकाणी सराव करतात त्यांना ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत जेतेपद मिळून बेळगावचे नांव उज्वल केल्याबद्दल वरील सर्व ज्युडो खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी खास अभिनंदन केले आहे.