बेळगावमधील महत्वपूर्ण धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सदरेच्या मुख्य चौथ्याऱ्यावर करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून कामाची व्यवस्था बघण्यात येत आहे.
बेळगावात अनेक चौक आहेत त्यापैकी धर्मवीर संभाजी चौक हा महत्त्वाचा चौक मानला जातो. बेळगावात येणारा माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने धर्मवीर संभाजी चौकात येतोच येतो आणि आज-काल ह्या चौकाची ओळख बेळगावचा अतिशय महत्त्वाचा चौक म्हणून झालेली असल्यामुळे या चौकाचे एकंदर सुशोभीकरण होणे गरजेचे होते.
त्याचबरोबर संभाजी महाराजांनी या परिसरात भेट दिलेल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध असल्यामुळे या चौकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आधुनिक पिढीला प्रेरणा मिळावी व इतिहासाची जागरूकता नागरिकात व्हावी या उद्देशातून आमदार अनिल बेनके यांनी पुढाकार घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक लोकाभिमुख आणि आकर्षक होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून साकार झालेलं हे स्मारकशिल्प हे बेळगावकरांचे भूषण ठरत आहे आणि त्यातून एक प्रेरणादायी वातावरण तयार होत आहे.
हे काम करण्यासाठी उत्तम दर्जाचे कारागीर अहोरात्र काम करत आहेत. या कामाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार बेनके यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मूर्ती स्थापित करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके धर्मवीर छत्रपती
संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, मराठा समाज्याचे नेते गुणवंत पाटील, लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव शिवसेना नेते बंडू केरवाडकर,नगरसेवक जयतीर्थ सौन्दती प्रवीण पाटील शिवप्रतिष्ठान शहर अध्यक्ष अजित जाधव प्रसाद मोरे, आदित्य पाटील, श्रीनाथ पवार ,यासह अन्य शिवभक्त उपस्थित होते