Tuesday, April 30, 2024

/

हलगा गायरानासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 belgaum

हलगा (ता. जि. बेळगाव) गावची एका खाजगी संस्थेच्या नावावर करण्यात आलेली 2 एकर गायरान जमीन पूर्ववत हलगा गावाच्या मालकीची करावी, अशी मागणी हलगा ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बसवंत बिळगोजी यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. पं. सदस्य व गावकऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना ग्रा. पं. सदानंद बिळगोजी म्हणाले की, हलगा गावच्या सर्व्हे नंबर 262 /ए मधील 20 एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन गायरान होती. या संपूर्ण जमिनीवर 2010 मध्ये भारतीय रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या खाजगी संस्थेचे नांव दाखल करण्यात आले आहे. तेंव्हापासून ती जमीन पुन्हा गावाला मिळावी यासाठी आमचा न्यायालयीन लढा सुरू आहे. हलगा गावातील गाई, म्हशी वगैरे जनावरांची संख्या जवळपास 2000 इतकी आहे.Halga memo k

 belgaum

या गुरांच्या चाऱ्यासाठी तसेच त्यांच्या दफनविधीसाठी सदर गायरान जमीन अनुकूल ठरत आहे. त्यामुळे ही जमीन एखाद्या संस्थेच्या नावावर करण्याद्वारे काढून घेण्यात आली तर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे नुकसान होण्याबरोबरच पशुपालकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन संबंधित गायरान जमीन पुनश्च गावाच्या नावावर करावी अशी आमची मागणी असल्याचे बिळगोजी यांनी सांगितले.

निवेदन सादर करतेवेळी हलगा ग्रा. पं. उपाध्यक्षा रूपा उर्फ मीनाक्षी राजेंद्र सुतार, सदस्य पिराजी जाधव, सागर कामानाचे, कल्पना हणमंताचे, सरोज वडगावी भुजंग सालगुडे, सबीर मुल्ला, लक्ष्मी गजपती, गणपत मारीहाळकर, रेखा चिक्कपरप्प, विलास परीट, लक्ष्मी संताजी, रेखा परीट, सुजाता देसाई, चेतन कुरंगी आदींसह गावकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.