बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय आवार आता चकाचक होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अर्थात डी सी कोर्ट कंपाऊंड मधील विविध विकास कामांसाठी 2कोटी 35 लाखांच्या निधीचे विविध कामाना उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चालना दिली आहे.
डी सी ऑफिस आवारातील रस्त्यांचे कोंक्रेट,पेवर्स बसवणे,दुकाने,गटारी आणि शेड निर्मिती केली जाणार आहे.आधी डी सी आवारातील रस्त्यांचे खड्डे बुजवा मग बेळगाव शहरातील रस्त्यांकडे लक्ष द्या अश्या बातम्या माध्यमात प्रसारित झाल्या होत्या त्याची दखल आमदार देआणि अधिकाऱ्यांनी घेत सार्वजनिक बांधकाम खाते बुडा आणि स्मार्ट सिटीच्या निधीतून हा विकास केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.नितेश पाटील यांच्या उपस्थितीत बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यतनट्टी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते नाईक, वरिष्ठ वकील आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर विकास कामाला चालना देण्यात आली.
संपूर्ण डीसी कंपाउंड आणि कोर्ट कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि गटर्स यासह झेडपी ऑफिस ते चव्हाट गल्ली, झेडपी ऑफिस ते सरदार स्कूल शेजारी (काकतीवेस रोडला टच) आणि डीसी ऑफिस ते रजिस्टर ऑफिस या पॅकेज अंतर्गत अंमलात आणण्यात आले असून पार्किंगची सुविधाही जोडण्यात आली आहे.
आंदोलकांसाठी शेड आणि नोटरींसाठी दुकाने आणि मूलभूत सुविधांचा या विकासकामांमध्ये समावेश आहे.