Sunday, December 15, 2024

/

गुलाबी थंडी चुलीवर कोंबडा,मळणीचा हुरूपच दांडगा!

 belgaum

मार्गशीष महिन्याच्या आगमनापूर्वी बेळगाव परिसरात थंडीने मात्र जोर वाढवला आहे.रविवारी २० नोव्हेंबर रोजी दुपार पासूनच बोचरी थंडी जाणवू लागली आहे त्यामुळं बेळगावकर गरम कपडे परिधान करणे पसंत करत आहेत.

सायंकाळीच्या वेळी पासूनच रस्त्यावरची गर्दी तुरळक होत चालली आहे त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारावर ही विपरीत परिणाम होत आहे बाजारपेठेवर मंदीची लाट पसरली आहे. बेळगाव शहर परिसरातील नागरिक घर बसल्या गरम गरम चहा, भजी चिरमुरे खारा खाने पसंत करत आहेत.

एकंदर थंडीचा महिना शरीर कमावण्याचा महिना असतो खाण्यापिण्याची रेलचेल आणि उष्ण तिखट गोड पदार्थ यांचे सेवन केले जाते नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने बेळगाव शहरातलं थंडीचे वातावरण अल्हाददायक असतं. बेळगावच्या अनेक ठिकाणी या थंडीच्या पर्यटनाची मजा पर्यटक उचलत असतात.काही हौशी पुढच्या महिन्यात येणाऱ्या थर्टी फस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.आता मात्र रजई घेऊन गुलाबी थंडीत झोप अनुभवायचं सुख बेळगावकर सध्या अनुभवत आहेत.

मद्यप्रेमी ही थंडीवरचा उतारा म्हणून आपले शौक पूर्ण करत आहेत ग्रामीण भागात विशेषता बेळगाव शहराच्या चारी आजूबाजूला असलेल्या भात शेतीच्या मळण्या जोरात सुरू झालेल्या आहेत आणि या रात्रीच्या मळण्याच्या दरम्यान थंडीची मजा लुटत अनेक जण काम करत असतानाचे चित्र सगळीकडे दिसत आहे.

cold-winterमळणीच्या खळ्यावरचं दृश्य दिलं खेचक आहे एका बाजूला मळणीची पात सुरू असते दोन चुली ढणढणत एकावर चहा आणि एकावर कोंबडा शिजत असतो असे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. चिरमुरे आणि चहाचा आस्वाद घेत मळणीकर चुलीवरच्या कोंबड्याच्या दरवळीचा सुवास घेत आपल्या भुकाना चाळवत बसलेले असतात आणि मळणीचे कष्ट विसरत असतात. हौशी मित्रमंडळी शेतकऱ्याच्या शेतावर मात्र गर्दी करत आहेत.

पेय पान, मळणीचा आस्वाद आणि कोंबड्याच्या रश्याचा स्वाद यात मळणी रंगत आहे. काही कोंबडे दुकानदारांनी मळणीसाठी खास सव्वाशे रुपये किलो कोंबडा ठेवले आहे त्यामुळे मळण्या या गुलाबी थंडीत रजत लज्जतदार आणि रंगतदार होत आहेत. अगं बाई, अग बाई, कोंबड्या विना रंगत नाही असा देखील सूर ग्रामीण भागात रंगताना दिसत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.