कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी’ हिंदू’ शब्दाबद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका होत असताना काँग्रेसचा एका नेत्याने जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ विधान केले आहे
बेळगावात एकीकडे भाजपा आक्रमक होत असताना दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनीही सतीश यांचे हिंदू बाबत केलेले विधान वैयक्तिक असल्याचे म्हटलं होतं मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बीके हरिप्रसाद यांनी सतीश जारकीहोळीच्या वक्तव्याला पाठिंबा व्यक्त केला आहे.
बेळगाव भाजपच्या वतीने सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात जोरदार निदर्शन करण्यात आली तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांचे बी के हरिप्रसाद यांनी समर्थन केले आहे.
लोकशाहीमध्ये घटनेप्रमाणे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यानुसार सतीश यांनी आपल मत मांडलं आहे.बुद्ध बसव आणि आंबेडकरांची विचारसरणी पुढे नेली आहे.
मानव बंधुत्व वेदिका या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजात असलेल्या अंधश्रद्धेवर जनजागृती करण्याचे काम केले आहे हिंदू या शब्दाबद्दल केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.