महाराष्ट्रातून सीमा वासियांसाठी लढणारा एक कणखर आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना मुलुख मैदान तोफ राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना टीम बेळगाव लाईव्ह आणि सीमा बांधवांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बेळगाव लाईव्ह चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी मुंबई भांडुप येथील कमलसागर त्यांच्या निवासस्थानी खास मुंबई येथे जाऊन संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या.
काही कारणास्तव शंभर दिवस कारावास भोगून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी सर्वात प्रथम सीमावासियांसाठी आवाज उठविला.शिंदे सरकारचा एकही प्रतिनिधी सीमा वासियांच्या काळ्या दिनाला गेला नाही. यासंदर्भात दुर्दैव म्हणावे ते किती? अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
नेहमीच सीमा प्रश्नासाठी आपली बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या संजय राऊत यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रकाश बेळगोजी यांनी मी सीमा भागातील मराठी पत्रकार असून समस्त सीमा वासियांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा आहेत. असे सांगून सीमा वासियांना आपल्या आधार आणि साथीची गरज आहे. अशी मागणी केली. त्यावेळी माझा पाठिंबा सीमा भागाला कायम असून सीमा वासियांना त्यांच्या अन्याय आणि अत्याचारातून दूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असे उद्गार ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी काढले.
संपूर्ण सीमा भाग तुमच्या पाठीशी आहे. असेही यावेळी प्रकाश बेळगोजी यांनी त्यांना सांगितले.
दरम्यान सीमा प्रश्नी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी उपस्थित असणे महत्त्वाचे असून यावेळी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी का गेला नाही? यासाठी आपण सरकारशी लवकरच चर्चा करणार असून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.