Monday, December 23, 2024

/

भजन स्पर्धेला झाली सुरुवात

 belgaum

बेळगाव येथील श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीने 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्वर सप्तसुरांचे, नाद भजनाचे खुल्या भव्य भजन गायन स्पर्धेचे कर शनिवारी सायंकाळी शानदार शुभारंभ झाला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सात भजनी मंडळांनी सुरेल स्वरात भजन आणि गवळण सादर करत वातावरण भारावून टाकले.

कपिलेश्वर मंदिरा शेजारील विसर्जन तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भजन गायन स्पर्धेचे दीपज्वलन, विठ्ठल रुक्माई पूजन तसेच पारितोषिक अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. स्वामी समर्थ आराधना मंडळाचे प्रमुख सुनील चौगुले, नगरसेवक गिरीश धोंगडी, संदीप सावंत व प्रतीक कलघगटगी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

18 बाय 30 आकाराच्या आकर्षक भव्य व्यासपीठावर विशेष प्रकाश योजना करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी श्री आडवी सिद्धेश्वर भजनी मंडळ वडगाव,माऊली महिला मंडळ महाद्वार रोड, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ वडगाव, श्री माता भक्ती महिला भजनी मंडळ भारत नगर व श्री नामदेव भजनी मंडळ शहापूर यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शिवानी व गायत्री यांच्या पंचपदीने झाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या भजनी मंडळाच्या कार्यक्रमानंतर त्यांचा विशेष सत्कार केला जात आहे.Bhajan sparsha

स्पर्धेसाठी कोल्हापूरचे प्रल्हाद जाधव आणि शिवराज पाटील परीक्षक म्हणून लाभले आहेत.
यावेळी मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, अनुप पवार, अभिजीत चव्हाण, सतीश निलजकर, राकेश कलघटगी,यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आज होणार यांच्या भजन सादर

रविवारी सायंकाळी रवळनाथ भजनी मंडळ अडकूर,श्री माऊली भजनी मंडळ शास्त्रीनगर, श्री भक्ती संस्कृती महिला भजनी मंडळ बापट गल्ली, सद्गुरु भजनी मंडळ भाग्यनगर,श्री विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ कंग्राळी, हरी ओम महिला भजनी मंडळ मच्छे, कलमेश्वर भजनी मंडळ शिनोळी, शिव गणेश भजनी मंडळ खानापूर, स्वरानंद कला मंच कंग्राळी खुर्द, लक्षवेधी बालिका आदर्श विद्यामंदिर टिळकवाडी या मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.