भारतातील अवकाश प्रवासाची भाडे चढाओढ स्पर्धेत चुरस निर्माण होत असून कमी प्रवास प्रवास खर्चाच्या स्पाइस जेट कंपनीने आज शुक्रवारी 18 नोव्हेंबर पासून दिल्ली -बेळगाव -दिल्ली विमान प्रवास भाड्यात 27 टक्के कपात केली आहे.
गेल्या वर्षभरात अशा पद्धतीने स्पाइस जेटने पहिल्यांदाच आपल्या प्रवासी तिकीट दरात कपात केली आहे. ही प्रवास भाडे कपात प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर लागू असणार आहे.
त्यानंतर उपलब्ध आसनानुसार एअरलाइन तिकिटाचा दर वाढवू शकते. आज शुक्रवारपासून दिल्ली -बेळगाव -दिल्ली विमान प्रवासासाठी स्पाइस जेटने तिकिटाचा दर 5499 रुपये इतका ठेवला आहे. याबरोबर सुविधा शुल्क आकारले जाईल.
स्पाइस जेटच्या दिल्ली -बेळगाव -दिल्ली विमानाचे वेळापत्रक आणि इतर माहिती पुढील प्रमाणे आहे. सध्या स्पाइस जेट एअरलाइन्सची दिल्ली आणि बेळगाव दरम्यानची विमानसेवा दररोज सुरू आहे. स्पाइस जेट विमान एसजी 8471 हे दिल्लीहून सकाळी 6:10 वाजता प्रस्थान करेल आणि बेळगावला सकाळी 8:30 वाजता पोहोचेल.
त्याचप्रमाणे स्पाईस जेट एसजी 8472 बेळगावहून सकाळी 9:00 वाजता प्रस्थान करेल आणि दिल्ली येथे सकाळी 11:15 वाजता पोहोचेल. बेळगाव दिल्ली प्रवासासाठी स्पाइस जेट बोईंग 737 -मॅक्स -8 या विमानाचा वापर करणार आहे.