तालुक्याच्या चारी बाजू जाणाऱ्या जवळपास 1300 एकर जमीन संपादित करणाऱ्या रिंग रोडला 823 हून अधिक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आता बेळगाव धारवाड रेल्वे लाईन च्या जमीन संपादनाला देखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गाला सुपीक जमीन देण्यास विरोध करत बेळगाव तालुक्यातील देसुर, नंदीहळी केकेकोप सह खानापूर व तालुक्यातील गर्लगुंजी येथील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला.धारवाड येथील के आयडीबीच्या विशेष जमीन अधिग्रहण अधिकाऱ्यांना वैयक्तिक आक्षेप नोंदवले.
या अगोदर या शेतकऱ्यांनी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन केलं होते या शिवाय प्रांताधिकारी जिल्हाधकाऱ्यांमार्फत निवेदन देत विरोध केला होता मात्र अद्याप या शेतकऱ्यांना आश्वासन मिळाले आहे.
बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी या भागातील शेतकऱ्यांना जमीन संपादन करण्यासाठी नोटिशी बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे या रेल्वे मार्गासाठी पर्यायी रेल्वे मार्गाचा विचार करावा या जमीन संपादित करू नये असा आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदवला आहे.पर्यायी मार्गाचा अवलंब केल्यास चार की.मी.अंतर कमी होणार आहे याशिवाय खर्चही कमी होणार आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून देखील जुन्या मार्गासाठी जमीन संपादनाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
पर्यायी रेल्वे मार्गामुळे प्रभुनगर, नंदीहल्ली आणि गर्लगुंजी आदी भागातील सुपीक जमिनी वाचणार आहेतअशीही भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.
प्रस्तावित रेल्वे मार्ग
बेळगाव देसुर कित्तूर धारवाड
एकूण रेल्वे मार्गाची लांबी- 73.2की. मी .
रेल्वे स्थानकांची संख्या -7
रेल्वे पुलांची संख्या -140
होणारे भूसंपादन -335हेक्टर
आवश्यक निधी-927.40कोटी