जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी नुकत्याच घेतलेल्या विकास आढावा बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव शहरासाठी 37000 एलईडी लॅम्प उपलब्ध झाले असल्याची माहिती दिली.
बेळगाव शहरासाठी असणारे हे सर्व एलईडी दिवे अर्थात लॅम्प बसविण्यासाठी 5 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. शहरात पथदीप बसविण्याचे संथ गतीने सुरू असलेले काम वेगाने निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यात यावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
हिवाळ्याचा मौसम सुरू होत असल्यामुळे रस्त्याची कामे तसेच स्मार्ट सिटी आणि महापालिकेची अन्य विकास कामे प्राधान्याने पूर्ण केली जावीत.
बेळगाव शहरातील बहुतांश पथदीप नादुरुस्त बंद अवस्थेत असून हिवाळ्यात ते पूर्ववत प्रज्वलित होतील याची दक्षता घेतली जावी, असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.