रघुनाथ पेठ, अनगोळ येथील शिवनेरी युवक मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेल्या किल्ले गोवळकोंडा (हैदराबाद) या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले.
शिवनेरी युवक मंडळाचे किल्ला बनवण्याचे यंदाचे हे 25 वे वर्ष आहे. गोवळकोंडा किल्ला प्रतिकृती उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून गजानन सोमणाचे, शिवाजी मुतगेकर, मेघन तारिहाळकर, विनायक राऊळ, नंदू हेब्बाळकर, दिगंबर शहापुरकर, शंकर बिर्जे, सुनिल पवार, नाथाजी सुरतेकर, प्रशांत नलवडे आणि चंद्रकात मुतगेकर उपस्थित होते.
प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन झाले. यावेळी मान्यवरांचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. भगवे वादळ संघटनेचे उपाध्यक्ष मेघन तारिहाळकर व विनायक राऊळ यांच्या हस्ते पुष्पहारासह श्रीफळ वाढवून गोवळकोंडा (हैदराबाद) या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले. रितेश पाटिल यानी किल्ल्याची माहिती आणि इतिहास सांगितला. यावेळी निमंत्रितांसह गल्लीतील पंच कमिटी, मंडळाचे सदस्य, नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
गेली 25 वर्षे शिवनेरी युवक मंडळाने अखंडपणे छ. शिवाजी महाराजांच्या ज्वलंत इतिहास अनेक किल्ल्याच्या माध्यमातून सादर केला आहे. आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये गडांचा राजा प्रथम, द्वितीय क्रमांक पटकात बेळगावातील अनेक महत्वाची पारितोषिके मिळाली आहेत. विविध किल्ले आणि हलत्या देखाव्यातुन शिवकालीन इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न या मंडळांने केला आहे.
यंदाही या मंडळाने गोवळकोंडा किल्ल्यात येसाजी कंक याच्या पराक्रमाचा हलता देखावा सादर केला आहे. उद्घाटनाप्रसंगी गजानन सोमणाचे, शिवाजी मुतगेकर, शंकर बिर्जे, सुरज चौगुले, नंदू हेब्बाळकर, योगेश कारेकर, प्रशांत नलवडे, गंगु चौगुले, अनंत ताहशिलदार, दिगंबर शहापुरकर, व्यंकटेश नलवडे व नाथाजी सुरतेकर यांनी मंडळाला देणगी देऊन कौतुक केले. यावेळी या किल्ल्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या सोहम शिंत्रे, सुमित राघोजी, रितेश पाटील व मंथन यळ्ळूरकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन सचिन मांगले यांनी केले.