Sunday, December 22, 2024

/

बोईंग प्रीमियर बिडर प्रोग्रॅममध्ये ‘ऍक्वस’ला स्थान

 belgaum

वैविध्यपूर्ण करार निर्मितीचा मंच असलेल्या बेळगावच्या ऍक्वस कंपनीने बोईंग प्रीमियर बिडर प्रोग्रॅम या देशातील प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात स्थान प्राप्त करण्याचा सन्मान मिळविला आहे.

सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावणारी बोईंग व्यावसायिक विमाने आणि बोईंग जागतिक सेवा पुरवठादारांना अधिकृत मान्यता देऊन गौरवण्याबरोबरच बोईंगची सामूहिक कामगिरी अधिक बळकट करणे, तसेच सुरक्षा, गुणवत्ता आणि एकात्मता याबाबतची वचनबद्धता दर्शविण्यासाठी या बोईंग प्रीमियर बिडर प्रोग्रॅमचे आयोजन केले जाते.

सदर कार्यक्रमात मिळालेल्या अधिकृत मान्यतेमुळे ऍक्वसला आता बोईंग कंपनीशी आपला व्यवसाय वाढवण्याची संधी प्राप्त झाली आहे. बीसीए प्रीमियर बिडर प्रोग्रॅमचा एक भाग बनणे हा आमच्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. आम्ही आजपर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची ती पोचपावती आहे. या अधिकृत मान्यतेमुळे आमच्यासाठी व्यवसायाच्या नव्या संधीची द्वारं खुली झाली आहेत, असे ऍक्वसचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीओओ राजीव कौल यांनी सांगितले.Aequs boeing

ऍक्वसने जवळपास 140 इतर पुरवठादारांना जोडून बोईंग प्रीमियर बिडर प्रोग्रॅममध्ये समाविष्ट होण्यासाठी आवश्यक असलेली उच्च गुणवत्ता, वितरण आणि कामगिरीच्या निकषांची पूर्तता केली आहे.

ऍक्वस ही वैविध्यपूर्ण करार निर्मिती करणारी कंपनी असून जी अवकाश तसेच खेळणी आणि ग्राहक टिकाऊ वस्तू उद्योगाला अनुलंब समाकलित उत्पादन उपाय उपलब्ध करते. ऍक्वस सध्याच्या घडीला संपूर्ण भारतासह फ्रान्स आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात उत्पादन सुविधा पुरवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.