के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी हिंदू या शब्दाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत बेळगावात भाजपने जोरदार निदर्शने केली.बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान कित्तूर राणी चन्नम्मा चौकात तब्बल दीड तासाहून अधिक काळ चक्का जाम करत आंदोलन केले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतीश यांच्या वर कारवाईची मागणी करत सतीश यांच प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढत दहन केले.
निपाणी येथील मानव बंधुत्व वेदिकेच्या मंचावरून सतीश यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे विधान केले आहे त्यांनी बुद्ध बसव आणि आंबेडकर यांच्या नावाखाली सनातन धर्माचा अपमान चालवला आहे असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.
कोणत्याही धर्माच्या विरोधात वक्तव्य करण्याआधी विचार करण्याची गरज आहे राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी कोणत्याही धर्मा बद्दल अपशब्द वापरणे खालच्या पातळीचे काम आहे दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम आहे त्यामुळं सतीश यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना यांना निवेदन देत करण्यात आली आहे.
अश्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत सतीश यांच्यावर स्वयं प्रेरित होऊन गुन्हा दाखल करावा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी देखील भाजपने केली आहे.
सकाळी अकराच्या दरम्यान शेकडोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते कन्नड साहित्य भवनात जमले होते त्यानंतर चन्नम्मा चौकात निदर्शन रस्ता रोको केला जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केलं.
बेळगावात भाजप कार्यकर्ते आक्रमक प्रेत यात्रा काढत केली सतीश जारकीहोळी यांच्या विरुद्ध निदर्शन|Belgaum Live| pic.twitter.com/2pwYSwxHR5
— Belgaumlive (@belgaumlive) November 9, 2022