संपूर्ण जगभरात संवादाचे एक महत्त्वाचे साधन मानले गेलेल्या व्हाट्सअप ची सेवि गेल्या तासाभरापासून बंद झाली आहे. तांत्रिक अडचणीमुळे व्हाट्सअप ची सेवा बंद झाल्याचे कळते.
भारतीय प्रमाण वेळेनुसार आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान व्हाट्सअप ची सेवा बंद झाली असून दुपारी 1:30पर्यंत तरी ही सेवा पूर्ववत झाली नव्हती. दुपारी अडीचच्या दरम्यान ही सेवा पूर्ववत रिस्टोअर करण्यात आली.
व्हाट्सअप सेवा बंद झाल्यामुळे कोट्यावधी युजेस ना आपले संदेश पाठवण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येऊ लागले. दरम्यान व्हाट्सअप ची सेवा कशामुळे खंडित झाली आहे यासंदर्भात अद्यापही कोणतीच अधिकृत माहिती जाहीर झालेली नव्हती.
गेल्या तासाभरापासून असलेल्या व्हाट्सअप बंदमुळे जगभरातील कोट्यावधी व्हाट्सअप युजर्सना ताटकळत राहावे लागले आहे.
केवळ भारतातच whatsapp चे 48 कोटी युजर्स आहेत. व्हाट्सअप सेवा ठप्प झाल्यामुळे व्हाट्सअप वरील व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग बंद झाले आहे. दरम्यान काही वेळापूर्वी लवकरच व्हाट्सअप सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती मेटा कंपनीने दिली आहे.
बेळगाव शहरात देखील whatsapp चे ठेवा ठप्प झाल्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या सह अनेकाना याचा त्रास झाला आहे.