कित्तूर उत्सवातून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. कित्तुर शहराच्या हद्दीत असणाऱ्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री हा अपघात घडला.
खानापूर तालुक्यातील कोरविकोप्प गावात राहणारा बाळप्पा तळवार (३३) आणि करेप्पा तळवार अशी मृतांची नावे आहेत. महामार्ग ओलांडत असताना अतिशय भरधाव कारची धडक बसून या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
भरधाव कार मध्यरात्री बाराच्या सुमारास बेळगावहून धारवाडकडे जात असताना हा अपघात झाला. या कारच्या स्वरूपात काळाने कित्तूर उत्सव आटोपून घरी परतणाऱ्या बाळाप्पा आणि करेप्पा यांच्यावर घाला घातला.
सदर अपघाताची कित्तूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.