पृष्ठभागावर डांबरीकरण करण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल ‘मेसर्स कृषी इन्फ्राटेक’ या कंत्राटदारावर 20 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे,याबाबतचे पत्रक दक्षिण पश्चिम रेल्वे कडून जारी करण्यात आले आहे.
संबंधित खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी टिळकवाडी बेळगाव येथील तिसऱ्या गेट उड्डाण पुलाची पाहणी व चौकशी केली त्यानंतर रेल्वे खात्याने ही कारवाई केली आहे.नित्कृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात प्रसार माध्यमांमधून जोरदार टीका झाली होती त्याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली.याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते. रस्त्याच्या घिसाडघाई करणाऱ्या ठेकेदाराला वीस लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) नुसार
1.) टिळकवाडी गेट 3 (ROB 381 च्या जागी) येथील रोड ओव्हर ब्रिज वाहनांच्या वाहतुकीसाठी संरचनात्मकदृष्ट्या योग्य आहे.
2.) अप्रोच रोड आणि गर्डरच्या जंक्शनवर एका ठिकाणी मुसळधार पावसामुळे डांबर जीर्ण झाले होते. त्याचे डांबरीकरण करून तातडीने दुरूस्ती करण्यात आली आहे.
3.) सरफेसिंगच्या (डांबरीकरण) अंमलबजावणीत निष्काळजीपणासाठी, रु. ठेकेदारावर 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.
4.)12 ऑक्टोबर रोजी आरओबीचे उद्घाटन झाल्याच्या 24 तासांच्या आत खड्डा तयार झाला होता. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी दुरुस्तीसाठी सुमारे 12 तास ते बंद ठेवण्यात आले होते.
बेळगाव टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे फाटका दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावरील रस्ता उद्घाटना बरोबरच टिकेचा विषय बनला होता. उद्घाटनाच्यादुसऱ्या दिवशी पुलावरील रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाचा पोलखोल झाला होता.
त्यानंतर उड्डाणपूलाच्या कामाबाबत सर्व स्तरातून जोरदार चर्चा सुरू होती.गल्लीपासून दिल्ली पर्यंतच्या माध्यमांनी या ब्रिजच्या खड्ड्याची दखल घेतली होती या शिवाय काँग्रेस आप ने थेट उड्डाण पुलावर जात आंदोलन केले होते याशिवाय ब्रिजच्या कामाचे वाभाडे काढत अतांत्रिक रित्या ब्रिजचे निर्माण झाल्याचा आरोप केला होता.
हे देखील वाचा
गोगटे उड्डाण पुलाला आली तडे मुजवण्याची वेळ
गोगटे सर्कल उड्डाण पुलाची थेट पंतप्रधानांकडे तक्रार